संदेश धार्मिक एकोप्याचा : मुस्‍लीम जोडप्‍याने मंदिरात बांधली लगीनगाठ!

संदेश धार्मिक एकोप्याचा : मुस्‍लीम जोडप्‍याने मंदिरात बांधली लगीनगाठ!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  धार्मिक एकोप्‍याचा संदेश देणारी घटना सिमला जिल्‍ह्यातील रामपूर येथे घडली. रविवारी ( दि. ५ ) रामपूर येथील हिंदू मंदिरात मुस्‍लिम जोडप्‍याचा विवाह झाला. विश्‍व हिंदू परिषद संचलित ठाकूर सत्‍यनारायण मंदिरात हा सोहळा पार पडला. या निकाह सोहळ्यावेळी मुस्‍लिम बांधवांसह हिंदू बांधवही उपस्‍थित होते. मंदिराच्या आवारात मौलवी, साक्षीदार आणि वकील यांच्या उपस्थितीत निकाह सोहळा पार पडला. ( Message of Religious harmony )

धार्मिक सलोख्‍याचा संदेश देण्‍यासाठी…

धार्मिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश समाजात पोहचावा, या उद्देशाने मंदिरात निकाह सोहळ्याचे आयोजन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. रामपूर येथील सत्यनारायण मंदिर परिसरात विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यालयही आहे. येथे निकाल सोहळा आयोजित करण्‍याचा निर्णय वधू-वराच्‍या पालकांनी घेतला.

सनातन धर्म सर्वांना पुढे जाण्‍याची प्रेरणा देतो : विनय शर्मा

या संदर्भात 'एएनआय'ला बोलताना ठाकूर सत्यनारायण मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस विनय शर्मा यांनी सांगितले की, "विश्‍व हिंदू परिषद आणि राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ हे मुस्‍लीमविरोधी असल्‍याचा आरोप अनेकदा केला जातो; पण ठाकूर सत्‍यनारायण मंदिरात एका मुस्‍लिम जोडप्‍याचा निकाह सोहळा पार पाडला आहे. सनातन धर्म सर्वांचा समावेश करुन सर्वांना पुढे जाण्‍याची प्रेरणा देतो."

Message of Religious harmony : विहिंप आणि मंदिर ट्रस्‍टचे सहकार्य

वधूपिता महेंद्रसिंग मलिक म्‍हणाले की, "माझ्‍या मुलीचा निकाह सोहळा सत्‍यनारायण मंदिर संकुलात पार पडला. नातेवाईकांसह विश्‍व हिंदू परिषद आणि मंदिर ट्रस्‍टचे आम्‍हाला सहकार्य लाभले. त्‍यांनी निकाह सोहळयाच्‍या आयोजनासाठी सहकार्य केले. या निकाह सोहळ्याच्‍या माध्‍यमातून रामपूरच्‍या जनतेने नागरिकांमध्‍ये बंधुभावाचा संदेश दिला आहे."

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news