
पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर आणखी एक खून प्रकरण (Delhi Murder Case) दिल्लीतील टिळक नगर परिसरात घडले आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर भागात शुक्रवारी (दि.३) एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. हे प्रकरण लिव्ह इन रिलेशनशीपमधून झाल्याचे सांगितले जात आहे. महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली असून महिलेच्या जबड्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. मृतदेहाचे तुकडे करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. परंतु महिलेच्या मुलीमुळे आरोपीचा हा प्रयत्न फसला. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंजाबमधून अटक केली आहे. मनप्रीत असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी अपहरण आणि खुनाचा गुन्ह्यात त्याचा सहभागी होता.
याबाबत (Delhi Murder Case) पोलिसांनी सांगितले की, मनप्रीत दिल्लीत सेकंड हँड कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे वडील अमेरिकेत स्थायिक आहेत. २००६ मध्ये त्यांचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. २०१५ मध्ये त्याची आणि मृत महिलेची ओळख झाली. त्यानंतर त्यांचा संपर्क वाढू लागला. आणि दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले आहे. त्यानंतर मनप्रीतने गणेश नगरमध्ये भाड्याने घर घेतले. या घरामध्ये तो या महिलेसोबत राहू लागला. कालांतराने हळूहळू त्याला वाटू लागले की आपण आता या महिलेच्या नात्यात अडकू लागलो आहोत. म्हणून त्याने त्या महिलेला संपवण्याचा कट रचला. १ डिसेंबरच्या रात्री तो फ्लॅटवर पोहोचला आणि त्याने महिलेच्या १६ वर्षीय मुलीला जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून झोपवले आणि चॉपरने महिलेचा गळा चिरून खून केला.
श्रद्धा खून प्रकरण पाहून आरोपीने हा प्लॅन आखल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच त्याने सँडपेपर विकत घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे नियोजनही असेच होते, मात्र घरात १६ वर्षीय तरुणी उपस्थित असल्याने त्याने केवळ खून केला. आणि फरार झाला होता. त्याला पंजाबमधून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचलंत का ?