मुंबई : धीरूबाई अंबानी स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : धीरूबाई अंबानी स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मुंबईमधील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी (दि.१०) एका अज्ञात कॉलद्वारे ही धमकी देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता सुमारास शाळेच्या लँडलाईनवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर कॉल लगेच डिस्कनेक्ट झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

व्यवस्थापनाने पोलिसांना दिली माहिती

धमकीचे फोन आल्यानंतर शाळेने स्थानिक पोलिसांना याविषयीची माहिती दिली. शाळेने केलेल्या तक्रारीच्या आधारे, BKC पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात कॉलरविरुद्ध आयपीसीच्या कलम 505 (1) (b) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.

फोन ट्रेस, लवकरच करणार अटक

दरम्यान, मुंबई पोलिसांनी फोन करणार्‍याचा शोध घेतला असून, लवकरच या आरोपीला अटक करणार असल्याचे सांगितले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला धमकीचा कॉल आला होता. त्यावेळी अज्ञात कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news