मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरसह ५ कारचा अपघात; २ ठार, ४ जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरसह ५ कारचा अपघात; २ ठार, ४ जखमी

खोपोली, पुढारी वृत्‍तसेवा : पुणे- मुंबई एक्सप्रेस हाईवेवर आज सकाळी कंटेनर (क्र. MH 46 AR 0181) हा पुण्याकडून मुंबईकडे जात असताना अचानक मुंबईकडील लेन सोडून दुस-या बाजूला येऊन पलटी झाला. अचानक झालेल्‍या या अपघातात 5 कार एकमेकांवर आदळल्‍या.

याबाबत पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पुणे- मुंबई एक्सप्रेस हाईवेवर कंटेनर अचानक लेन सोडून दुस-या बाजूला पलटी झाला. यानंतर येणा-या 5 कार एकमेकांवर आदळल्‍या. यामध्ये 1 चालक व 1 महिला जागीच ठार झाले. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्‍काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, इतर कार मधील 2 महिला जखमी असून त्यांना एमजीएम रुग्णालय कामोठे येथील दाखल केले आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. परंतु पुणे दिशेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने असून अपघात झालेली वाहने बाजूला काढण्यासाठी काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आलेली होती. आता वाहतूक संतगीने सुरू करण्यात आली आहे अशी माहिती रायगड जिल्हा पाेलिस अधिक्षक साेमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

-हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news