मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुर्ला स्थानकात मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. याचा फटका प्रवाशांना बसला आहे. ट्रॉम्बे यार्ड येथून कुर्ला यार्डला जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिन शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुर्ला स्थानकात बिघडले. यामुळे मालगाडी जागीच खोळंबली. परिणामी हार्बर मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतुक बंद झाली होती.
हेही वाचा :