Maharashtra Politics : दीपक केसरकर यांनी घेतली शरद पवारांची भेट: चर्चांना उधाण | पुढारी

Maharashtra Politics : दीपक केसरकर यांनी घेतली शरद पवारांची भेट: चर्चांना उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज (दि.२८) सदिच्छा भेट घेतली. या भेटीबाबत पवार  यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून माहिती दिली आहे. दरम्यान, या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्याच्या राजकारणात अलिकडच्या काळात अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या दिग्गज ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांचे खंडन केले होते. तरीही शिंदे गटात काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

हेही वाचा 

Back to top button