मुंबई-नागपूर एकेरी विशेष ट्रेन शुक्रवारी धावणार

Holi Special Train
Holi Special Train

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर विशेष शुल्कासह शुक्रवारी एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. ०११८१ ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुक्रवार २ सप्टेंबर रोजी २१.१० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा.

डब्यांची स्थिती : दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण : गाडी क्र. ०११८१ वन-वे विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग ३१ ऑगस्ट रोजी सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news