पुढारी ऑनलाईन :
मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचना ही सोयीनुसार होत आहे, असा आक्षेप घेत याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली. वॉर्डपुनर्रचनेबाबत काँग्रेसचे पदाधिकारी नाराज आहेत. नाना पटोले यांचा शिवसेनेला इशारा मानला जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी धुळ्यात बोलताना मुंबई महापालिकेसंदर्भात एक भाकित वर्तवले. मुंबईत शिवसेनेची सत्ता येणार असून, महापौर शिवसेनेचाच होईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार, अशा चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, सध्या सत्तेत तिन्ही पक्षांचे सरकार असताना, तीन पक्षांच्या समन्वयाने प्रत्येक निर्णय हाेणे गरजेचे आहे. प्रत्येक पक्षाने मित्र पक्षांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. सध्याचे वातावरण पाहता, राज्यात सत्तेसाठी धर्माचं राजकारण होत आहे. राजकारणात धर्म आणू नये ही काँग्रेसची भूमिका असल्याचे पटाेले म्हणाले.
हेही वाचा :