मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफ गाठू शकते, मात्र धावांचा हिमालय उभारावा लागेल!

मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफ गाठू शकते, मात्र धावांचा हिमालय उभारावा लागेल!
Published on
Updated on

कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८६ धावांनी पराभव केला. मात्र केकेआरच्या विजयापेक्षा मुंबई इंडियन्स सध्या जास्त चर्चेत आहे. कायम अखेरच्या क्षणी प्ले ऑफमध्ये जाऊन आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात अजूनही प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे? असा प्रश्न सर्व मुंबईच्या चाहत्यांना पडला आहे.

या प्रश्नाचे उत्तर आहे होय अजूनही मुंबई प्ले ऑफ गाठू शकते. मुंबई इंडियन्स अजूनही एक सामना खेळणार आहे. त्यांचा उद्या ( दि. ८ ) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात मुंबईला भीम पराक्रम करावा लागेल. सर्वात पहिले म्हणजे त्यांना टॉस जिंकावा लागेल आणि पहिल्यांदा फलंदाजी घ्यावी लागेल. मग त्यांना हैदराबादच्या गोलंदाजांचा बुकणा पाडत २५० धावांपेक्षा जास्त धावा उभाराव्या लागतील. जरी मुंबईच्या पलटनने हा भीम पराक्रम केला तरी. त्यांना गोलंदाजीतही शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. त्यांना हैदराबादचा १७० धावांपेक्षा जास्त धावांनी पराभव करावा लागेल.

जर मुंबई टॉस हरली आणि हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी घेतली तर मुंबईचा टॉसच्या वेळीच पिक्चर पडणार आहे. कारण मुंबईला चेस करुन केकेआरचे रनरेट पार करता येणार नाही. उद्या मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबाद बरोबर होणार आहे. जर मुंबईने हा सामना जिंकला तर त्यांचे आणि केकेआरचे समान १४ गुण होतील. मात्र रनरेटच्या आधारवर केकेआर प्ले ऑफमध्ये दाखल होईल. केकेआरचे रनरेट अधिक ०.५८७ इतके आहे. तर मुंबईचे रनरेट उणे ०.०४८ इतके आहे.

केकेआरने आजच्या सामन्यात राजस्थानसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले. केकेआरकडून शुभमन गिलने सर्वाधिक ५६ धावा केल्या. त्याला व्यंकटेश अय्यरने ३८ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. केकेआरचे हे १७२ धावांचे आव्हान राजस्थानला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ८५ धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. राजस्थानकडून राहुल तेवतियाने एकाकी झुंज देत ४४ धावांची खेळी केली. केकेआरकडून शिवम मावी आणि लोकी फर्ग्युसनने भेदक मारा केला. मावीने २१ धावात ४ तर फर्ग्युसनने १८ धावात ३ बळी टिपले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news