चेन्नईने सामना हरला मात्र दीपक चाहर तू जिंकलास भावा! - पुढारी

चेन्नईने सामना हरला मात्र दीपक चाहर तू जिंकलास भावा!

दुबई : पुढारी ऑनलाईन

चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जने ६ विकेट राखून मोठा पराभव केला. मात्र दीपक चाहर याने केलेल्या जबरदस्त कृतीमुळे हे पराभवाचे वातावरण निवळून गेले. दीपक चाहर सामना संपल्यानंतर थेट प्रेक्षक गॅलरीत गेला आणि त्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोजच करुन टाकले. दीपक चाहरने त्याच्या गर्लफ्रेंडला केलेल्या प्रपोजचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे दीपक चाहरचा हा प्रस्ताव त्याच्या गर्लफ्रेंडने स्विकारला आहे. दीपक चाहरच्या या स्टायलिश प्रपोजमागेही धोनीची रणनीती आहे. दीपक चाहर त्याच्या गर्ल्डफ्रेंडला प्ले ऑफच्या सामन्यावेळी प्रपोज करणार होता. याबाबत धोनीशीही तो बोलला होता. धोनीने त्याला प्लॅ ऑफच्या सामन्याऐवजी साखळी फेरीतील सामन्यात प्रपोज करण्यास सांगितले. त्यामुळेच दीपक चाहरने पंजाब किंग्जच्या सामन्यावेळी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले.

हेही वाचा : जम्मू काश्मीरची स्पीडगन उमरान मलिकवर लक्ष ठेवलायला हवे : विराट

ज्यावेळी दीपक चाहर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करत होता त्यावेळी कर्णधार धोनीही त्या ठिकाणी उपस्थीत होता. दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या फॅन्सनीही दीपकच्या या प्रपोजला टाळ्या वाजवून चांगली दाद दिली.

दीपक चाहर

 

 

 

 

आजच्या चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्ज इलेव्हन सामन्यात चेन्नईने पंजाबसमोर १३५ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. चेन्नईकडून फाफ ड्युप्लेसिसने सर्वाधिक ७६ धावा केल्या. प्रत्युतरात खेळणाऱ्या पंजाबने हे १३५ धावांचे आव्हान १३ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. कर्णधार केएल राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावांची तुफानी खेळी केली. ही खेळी त्याने ८ षटकार आणि ७ चौकारांनी सजवली.

 

 

 

Back to top button