पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma 6000 Runs : रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात 6000 धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सच्या या वादळी फलंदाजाने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
रोहितच्या आधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विराट कोहली, दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नर आणि पंजाब किंग्सचा शिखर धवन यांनी आयपीएलमध्ये 6 हजार पेक्षा जास्त धावा अपल्या खात्यात जमा केल्या आहेत. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहितला 6000 धावा पूर्ण करण्यासाठी 14 धावांची गरज होती. आपल्या 227व्या आयपीएल डावात ही कामगिरी करणारा तो सर्वात संथ फलंदाज ठरला. (Rohit Sharma 6000 Runs)
रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 232 सामन्यांमध्ये 30.22 च्या सरासरीने आणि 130.03 च्या स्ट्राइक रेटने 6014 धावा केल्या आहेत. रोहितपूर्वी तीन खेळाडूंनी आयपीएलमध्ये ही खास कामगिरी केली आहे. या यादीत पहिले नाव आहे आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीचे. त्याने 228 आयपीएल सामन्यांमध्ये 6844 धावा केल्या आहेत. या यादीत विराटशिवाय शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने 210 सामन्यात 6476 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 166 आयपीएल सामन्यांमध्ये 6056 धावा केल्या आहेत.
1. विराट कोहली -6844
2. शिखर धवन-6477
3. डेव्हिड वॉर्नर-6109
4. रोहित शर्मा – 6014
रोहित शर्मा 2013 मध्ये प्रथमच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला. कर्णधार म्हणून रोहित शर्माचे रेकॉर्डही अप्रतिम आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत एकूण पाच वेळा आयपीएल जिंकले आहे. रोहितला गेल्या तीन हंगामात आयपीएलमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला आहे. अलीकडेच, त्याने जवळपास दोन वर्षांतील पहिले आयपीएल अर्धशतक झळकावले. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक ठोकले आणि 24 सामन्यांनंतरचे हे त्याचे पहिले आयपीएल अर्धशतक ठरले.