पुढारी ऑनलाईन: भारतीय हवामान खात्याने आज (१९ जुलै) पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. या अंदाजानुसार मुबईसह रायगड, पालघर आणि काही भागात मुसळधार पासाने आज (दि.१० जुलै) सकाळपासून थैमान (Mumbai Heavy Rain) घातला आहे.
पालघर आणि रायगड (महाड) येथे आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्येकी एक NDRF टीम तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती NDRF ने दिली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर (Mumbai Heavy Rain) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
रायगडच्या रसायनी पोलीस ठाण्यात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. तसेच येथील आपटा गावात नदी किनारे लगत वस्तीत पाणी भरल असुन, तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे, दरम्यामन परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी, अंबा नदी आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदीही धोक्याचे पातळी ओलांडण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.