मुंबई : विलेपार्लेतील गोविंदाचा मृत्यू

मुंबई : विलेपार्लेतील गोविंदाचा मृत्यू
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दहीहंडी उत्सव साजरा करताना गंभीर जखमी झालेल्या विलेपार्ले येथील 24 वर्षीय संदेश दळवी या गोविंदाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. संदेशचा सोमवारी रात्री उपचारदरम्यान नानावटी रुग्णालयात मृत्यू झाल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

विलेपार्ले येथील रहिवासी असलेला संदेश दळवी हा सायन शंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. दहीहंडीच्या दिवशी संदेश बामणवाडा येथील हंडी फोडताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता. यात त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. संदेशला सुरुवातीला उपचारासाठी कूपर रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी
नानावटी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, सोमवारी रात्री डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, दहीहंडीचे आयोजक रियाझ मस्तान शेख यांच्याविरोधात गोविंदांना सुरक्षा उपकरणे न दिल्याने मानवी पिरॅमिड उभारताना विनय रबडे आणि संदेश दळवी हे गोविंदा खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळाचा प्रथमेश सावंत हा गोविंदाही गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रथमेश सावंत याला 7 लाख 50 हजार रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे.

तसेच संदेश दळवी, अविनाश भोईर, समीर गुढेकर, संतोष शिंदे या चार जखमी गोविंदांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मदत संबंधितापर्यंत पोहोचली नाही. दळवीची प्राणज्योत मालवली तरी त्याच्या कुटुंबापर्यंत मदत पोहोचलेली नव्हती, असे समजते. हिंदुजामध्येही दाखल झालेल्या एका गोविंदाला रुग्णालय प्रशासन उपचाराचे पैसे भरण्यास सांगत होते. हा गोविंदाही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news