गंगुबाई काठीयावाडीची इमारत धोकादायक घोषित

गंगुबाई काठीयावाडीची इमारत धोकादायक घोषित
Published on
Updated on
मुंबई: पुढारी वृत्‍तसेवा :   गेल्या वर्षी गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा आणि अलिया भटचा अभिनय पाहून हा चित्रपट लोकांचा चांगला पसंतीस उतरला होता. गंगुबाई काठीयावाडी मुंबईतल्या १४ कामठीपुरा येथील ज्या दारूवाला इमारतीत राहत होती ती इमारत काही दिवसांपूर्वी म्हाडा कार्यालयाने धोकादाय म्हणून घोषित केली ह्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गंगुबाई यांचे एक स्मारकही उभारण्यात आले आहे. ह्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ३५ लाखांची गरज असताना अवघ्या साडेतीन लाख रुपयांमध्ये दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराला दिल्यामुळे रहिवासी आणि दुकानदारांनी या दुरुस्तीला विरोध दर्शवला आहे.
कामाठीपुरा येथील १४ वया गलीच्या नाक्यावर असलेली ४५ दारूवाला बिल्डिंग ही २ मजली इमारत म्हाडा तर्फे धोकादाय घोषित करण्यात आली. ह्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. जीव मुठीत धरून २१ कुटुंब आजही ह्या इमारतीत  राहत आहेत. रहिवाशांना घरे खाली करण्याकरता म्हाडा तर्फे ३ वेळा व्हेकेशन नोटीस देण्यात आल्या आहेत.
गणेश नावाच्या म्हाडा कंत्राटदाराला इमारतीतील  रहिवाशांनी मिळून आठ ते दहा लाख रुपये जमा करून दुरुस्तीसाठी वेगळे पैसे दिले आहेत. काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदार थातुर मातुर काम करून रहिवाशांकडे दुरुस्तीसाठी आणखी पैसे मागत आहे.  इमारतीचच्या दुरुतीची काम तळजल्यापासून सुरू करण्याऐवजी वरच्या मजल्यावरून चालू केल्यामुळे नागरिकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. व काम थांबवण्यास सांगितले आहे.तसेच ह्या जीर्ण इमारतीला टेकू लावण्यासाठी १४ लाखांचे कंत्राट म्हाडा अधिकाऱयांनी गुपचूप काढल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.इमारतीच्या दुरुस्ती बाबत व्यवसायिक सचिन शेट्टी आणि उमेश शर्मा यांनी म्हाडाकडे रीतसर तक्रार केली आहे.
म्हाडाचे आर्किटेक सोनलकर यांनी इमारतीची पाहणी करून दारूवाला इमारत धोकादायक असल्याचे सांगितले होते. व महानगरपालिकेकडून आयओडी सीसी घेऊन इमारतीचे संरचनात्मक दुरुस्तीसाठी ३५ ते ४० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले होते. तरी देखील म्हाडाने निविदा काढून ठेकेदाराला ३.५० लाखांचे कंत्राट दिले आहे असे  शेट्टी ह्यांनी सांगितले रहिवाशांची तक्रार आल्यानंतर मुंबादेवी उपविभाग अध्यक्ष विनोद आर्गीले यांनी अनेक वेळा म्हाडा कार्यालयात जाऊन  पाठपुरावा केला आहे पण माढा अधिकारी कोणालाही दात देत नाहीत स्वतःची मनमर्जी करत असल्याचे सांगितले.
म्हाडा आर आर बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जेव्हा रहिवाश्यांनी इमारतीच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली असता सदर इमारत नोटीस देऊन जमीनदोस्त  करण्यासाठी सांगितले परंतु म्हाडा अधिकारी मात्र पैसे कमवण्याच्या नादात निविदा काढून मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.
.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news