Khalistani : मुंबई, दिल्लीत बाॅम्बस्फोटाचा कट; खलिस्तान्याला जर्मनीतून अटक

Khalistani : मुंबई, दिल्लीत बाॅम्बस्फोटाचा कट; खलिस्तान्याला जर्मनीतून अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : लुधियाना जिल्हा न्यायालयात झालेल्या बाॅम्बस्फोटाचे धागेदोरे परदेशात सक्रीय असणाऱ्या 'खलिस्तानी संघटना : शीख फाॅर जस्टिस'शी (Khalistani) जोडलेले आढळून आले आहे. जर्मनीच्या पोलिसांनी या प्रकरणात जसविंदर सिंह मुल्तानी याला  केली आहे. जसविंदर हा   'खलिस्तानी संघटना : शीख फाॅर जस्टिस'चा मुख्य सदस्य असल्याची माहिती प्राथमिक चाैकशीत समाेर आली आहे.

या घटनेची माहिती असणाऱ्या लोकांकडून असं सांगण्यात येत आहेत की, लुधियाना नंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये बाॅम्बस्फोट घडवून आणण्याच्या कट रचत होता. नवी दिल्ली आणि जर्मनीच्या बाॅन शहरात असणाऱ्या डिप्लोमॅट्सने सांगितले की, या प्रकरणासंदर्भात केंद्र सरकारतर्फे जर्मनीला कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या मागणीनंतर जसविंदर सिंह मुल्तानीला जर्मन पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्‍याचे   संबंध पाकिस्तानशीदेखील होते. इतकंच नाही तर पंजाबच्या सीमेवर येणाऱ्या शस्त्रांच्या प्रकरणातही मुल्तानीचा हात होता. ४५ वर्षीय मुल्तानी हा शीख फाॅर जस्टिसचे संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नू यांचा जवळचा सहकारी होता. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, ताे खूप काळापासून फुटिरतावादी संघटनांमध्ये सक्रीय राहिलेला आहे. (Khalistani)

मुल्तानी कसा आला रडारवर…

२३ डिसेंबर रोजी लुधियाना जिल्हा न्यायालयात बाॅम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात ड्रग्ज तस्करी नेटवर्क असण्याची शंका पोलिसांना होती. या हल्ल्यानंतर राज्यात हाय अलर्ट लावण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नुकतेच पाकिस्तानात असणाऱ्या संघटनांशी हातमिळवणी करून सीमेवरून पंजाबमध्ये शस्त्रं, बाॅम्ब स्फोटके आणि हॅण्ड ग्रेनेड पाठविण्याचा प्रयत्न होता. त्यात मुल्तानीचा सहभाग होता. त्यामुळेच तो गुप्तचर विभागाच्या रडाडवर आला. या शस्त्रांच्या आधारावरच मुल्तानी पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात होता.

नुकतीत गुप्त एजन्सींना माहिती मिळाली होती की, मुल्तानी हा पाकिस्तानच्या मदतीने आणखी काही विस्फोटक पंजाबमध्ये पाठविण्याच्या तयारीत होता. जेणे करून पंजाबमध्ये दहशत पसरेल आणि भीतीचे वातावरण निर्णाम होऊ शकेल. हा मुल्तानी मार्गदर्शक हरदीप सिंह निज्जर, परमजीत सिंह पामा, साबी सिंह, कुलवंत सिंह मोथाडा आणि इतर लोकांशीही संपर्कात होता.

पाहा व्हिडीओ : मनुस्मृती मनुस्मृतीचे दहन आणि बाबासाहेबांचा विद्रोह

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news