पुढारी ऑनलाईन डेस्क : मागच्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाच्या बाबतीत मुंबईतून काही दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागच्या चार दिवसांपासून घट होत आहे. मुंबई महानगरमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. Mumbai Corona)
मुंबईत मागच्या २४ तासांत कोरोनाचे ११,६४७ नवे रुग्ण आढळून आले असून, या कालावधीत कोरोना संसर्गामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चार दिवसांपूर्वी येथील कोरोना पॉझिटिव्ह दर ३० टक्के होता. तर मागच्या २४ तासांत शहरात ६२,०९७ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९४ हजार ७२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६०,४०५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ९ लाख ५५ हजार ३१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,८६८ एवढी झाली आहे.
याआधीच्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख थोडा स्थिरावल्याचे दिसून आले होते. सोमवारी दिवसभरात १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २७७ रूग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.३६ टक्के नोंदवण्यात आला होता. पण आता रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत ४८१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने दिली आहे.
कोरोना उपचारातून 'मोल्नुपिरावीर' औषध रद्द कोरोनावरील उपचार पद्धतीत 'मोल्नुपिरावीर' औषधाचा समावेश करू नये, असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) कोरोनाविषयक राष्ट्रीय टास्क फोर्सने काढला आहे.
'मोल्नुपिरावीर'च्या अनुषंगाने सुरक्षाविषयक चिंता असल्याचे गेल्या आठवड्यात 'आयसीएमआर'चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले होते.
अँटिव्हायरल ड्रग 'मोल्नुपिरावीर'चा वापर १५ ते ४५ वयोगटातील महिला कोरोनाग्रस्तांवर करण्यात येऊ नये, असा इशारा 'नॅशनल टेक्निकल अॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन'नेही मंगळवारी दिला होता.
१४ डिसेंबर- २२५
१५ डिसेंबर – २३८
१६ डिसेंबर – २७९
१७ डिसेंबर – २९५
१८ डिसेंबर – २८३
१९ डिसेंबर – ३३६
२० डिसेंबर – २०४
२१ डिसेंबर -३२७
२२ डिसेंबर -४९०
२३ डिसेंबर -६०२
२४ डिसेंबर-६८३
२५ डिसेंबर-७५७
२६ डिसेंबर -९२२
२७ डिसेंबर -८०९
२८ डिसेंबर-१३७७
२९ डिसेंबर-२५१०
३० डिसेंबर -३६७१
३१ डिसेंबर -५६३१
१ जानेवारी – ६३४७
२ जानेवारी – ८०६३
३ जानेवारी – ८०८२
४ जानेवारी – १०८६०
५ जानेवारी – १५१६६
६ जानेवारी – २०१८१
७ जानेवारी -२०९७१
८ जानेवारी-२०३१८
९ जानेवारी – १९४७४
१० जाने-१३६४८
११ जाने-११६४७