मुंबई : कांजूरमार्ग येथील रॉयलपार्क इमारतीला भीषण आग

मुंबई : कांजूरमार्ग येथील रॉयलपार्क इमारतीला भीषण आग

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा  कांजूरमार्ग येथील एन जी रॉयलपार्क मधील इमारत क्रमांक 2 बी ला आज (सोमवार) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग पसरत दहाव्या आणि सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. यावेळी आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट इमारती मधून बाहेर येत होते.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण इमारती मधील नागरिकांना बाहेर काढले आहे. सध्या या आगीत कोणीही अडकले नसल्याचे स्थानिक सांगत आहेत. मात्र या आगीत तीन घरे जळून खाक झाली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news