पुढारी ऑनलाईन डेस्क : बांदा तुरुंगात असलेला कुविख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी (दि.२९) रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने (कार्डिया अटक) मृत्यू झाला होता. मुख्तारच्या मृत्यूनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात अलर्ट जारी केला असून अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. Mukhtar Ansari Death
मुख्तार अन्सारी यांचा मुलगा उमर अन्सारी याने बांदाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून वडिलांचे शवविच्छेदन दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी करावे, अशी मागणी केली आहे. अन्सारी यांनी पत्रात लिहिले आहे की, त्यांच्या कुटुंबाचा बांदा येथील वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास नाही. Mukhtar Ansari Death
बांदा तुरुंगात जेवणात विष देण्यात आल्याचा आरोप माफिया मुख्तार अन्सारीच्या कुटुंबीयांनी केला आहे. सरकारला त्याला मारायचे होते. त्यानंतर आता मुख्तार अन्सारीच्या मृत्यूच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कासगंज तुरुंगात बंद असलेले आमदार अब्बास यांची पत्नी निखतने सासरे मुख्तार यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी पतीला भेटले होते. दोघांमध्ये सुमारे तीस मिनिटे चर्चा झाली. दुसरीकडे, मुख्तारच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचे संपूर्ण कुटुंब अब्बासच्या पॅरोलसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचले.
गुंडगिरीतून राजकारणी बनलेले मुख्तार अन्सारी यांच्या मृत्यूबद्दल, सीपीआय(एम) नेत्या वृंदा करात म्हणाल्या की, त्यांचा (मुख्तार अन्सारी) कोठडीत मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वी त्यांनी अनेकदा सांगितले की त्यांना हळूहळू विष दिले जात आहे. त्यामुळे त्यांचा संशयास्पद मृत्यू वाटत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असतील तर त्याला न्यायप्रक्रियेनुसार शिक्षा झाली पाहिजे, तो वारंवार आजारी पडत होता, त्याला स्लो पॉयझन दिले जात असल्याचे वारंवार सांगत होते, पण त्याची चौकशी झाली नाही.
हेही वाचा