msrtc strike : एसटी महामंडळाचे 58 कर्मचारी निलंबित

एसटी
एसटी

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : msrtc strike : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील आठ-दहा दिवसांपासून एस.टी.महामंडळातील कर्मचार्‍यांचा संप सुरू असून बसेस बंद असल्यामुळे महामंडळाला कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे.संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात निर्णय विभागीय कार्यालयाने घेतला असून जिल्हयातील 58 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यातआले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अमित माळी यांनी दिली आहे.

महाराष्ट एस.टी.कर्मचारी संयुक्त कृती समितीने 31 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे, त्यामुळे बससेवेवर परिणाम झाला असून बसची चाके थांबली आहेत.या आंदोलनामुळे नांदेड विभागीय कार्यालयाला 6 ते 7 कोटी रूपयांचा फटका बसला आहे.जिल्ह्यातील सर्व आगारासह विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मागील दहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून अद्यापपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात आले नाही,त्यामुळे नांदेड विभागीय कार्यालयाने निलंबनाचे हत्यार उपसले असून मंगळवार दि.9 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 58 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे, याबाबतचे आदेश विभागीय वाहतूक अधिक्षकांनी काढले आहेत. यामध्ये 15 चालक, 29 वाहकांसह कार्यशाळेतील 13 तर विभागीय कार्यालयातील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे.

एकाचवेळी 58 कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ असून.या निलंबनास्त्रामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news