रांचीत MS धोनी ‘सुसाट’!, ‘Honda Repsol’ राईडचा व्‍हिडिओ व्‍हायरल

रांचीत MS धोनी ‘सुसाट’!, ‘Honda Repsol’ राईडचा व्‍हिडिओ व्‍हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे बाईक प्रेम सर्वांनाच माहित आहे. नुकतेच माजी क्रिकेटपटू व्‍यंकटेश प्रसाद याने सोशल मीडियावर एक व्‍हिडिओ शेअर करत त्‍याची झलकही सर्वांना दाखवली होती. यावेळी धोनीच्‍या चाहत्‍यांना पुन्‍हा एकदा त्‍याच्‍या मोटारसायकल आणि कार प्रेमाची प्रचीती आली होती. आता रांचीमधून धोनीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्‍ये धोनी बाईक चालवताना दिसत आहे. धोनी Honda Repsol 150 बाईक चालवत आहे. या व्‍हायरल व्हिडिओला चाहत्‍यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. (MS Dhoni video viral)

माजी भारतीय क्रिकेटर प्रसाद याने नुकतीच रांचीला जाऊन धोनीची भेट घेतली होती. वेंकटेश प्रसाद यांनीही धोनीच्या घरी बाईक आणि कारचे कलेक्शन पाहून ट्विट केले होते. यामध्‍ये त्‍यांनी धोनीच्‍या मोटारसायकल आणि कारच्‍या कलेक्‍शनची थक्‍क करणारी माहिती दिली होती. ( MS Dhoni video viral)

आयपीएलच्या गेल्या मोसमात धोनी गुडघ्यावर पट्टी बांधून खेळताना दिसला होता. अशा परिस्थितीत त्‍याने चेन्‍नई संघाला पाचव्‍यांदा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. यानंतर धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रियाही झाली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news