Mumbai diaries-2 : सुजाता अजावले बनून आलीय मृण्मयी, मुंबई डायरीज -२ रिलीज

मृण्मयी देशपांडे
मृण्मयी देशपांडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मुंबई डायरीज – २ भेटीला आला आहे. (Mumbai diaries -2) मृण्मयीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून तुम्ही मुंबई डायरीजचा दुसरा पार्ट पाहण्याची गरज आहे, अशी कॅप्शन दिलीय. तिने इन्स्टाग्रामवर लिहिलंय- You need to watch Mumbai diaries season 2!

संबंधित बातम्या- 

मृण्मयीच्या या पोस्टवर खूप साऱ्या लव्हली आणि फायर इमोजी पाहायला मिळत आहेत. सीरिजमध्ये मृण्मयी देशपांडे सुजाता अजावलेच्या भूमिकेत आहे.

ही सीरीज निखिल आडवाणींनी दिग्दर्शित केलं आहे. या सीरिजमध्ये मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धनवंतरी, सत्यजीत दुबे, कोंकणा सेन असे दिग्गज कलाकार असणार आहेत. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, शरद पोंक्षे ही तगडी स्टारकास्ट देखील आहे.

मुंबई डायरीजचा पहिला पार्टही खूप प्रसिद्ध झाला होता. आता दुसऱ्या सीझनलाही खूप प्रतिक्रिया मिळत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई शहरात पुरामुळे हाहाकार उडाला असताना बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी कशाप्रकारे आव्हाने, अडचणीतून मार्ग काढतात, ही कहाणी 'मुंबई डायरीज-२' मध्ये दाखवण्यात आलीय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news