पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur-Nani) आणि साऊथ अभिनेता नानी (Mrunal Thakur-Nani) यांचा नवा चित्रपट 'हाय नन्ना' (Hi Nanna) ओटीटीवर रिलीज होणार आहे. शौरयुव दिग्दर्शित 'हाय नन्ना' ७ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. मृणाल – नानीच्या चित्रपटला प्रेक्षकांसोबत चित्रपट समीक्षकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. रिपोर्टनुसार, २१ दिवसांत फॅमिली ड्रामाने जवळपास ४६ कोटी रु. कमावले आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवर देखील पाहता येऊ शकेल.
संबंधित बातम्या –
'हाय नन्ना' एक महिन्यानंतर ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाचे स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) वर होईल. ह चित्रपट ४ जानेवारी २०२४ पसून नेटफ्लिक्सवर पाहता येऊ शकेल. ३० डिसेंबर, २०२३ रोजी नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर यसंदर्भात घोषणा केली आहे. ओटीटीवर हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहू शकता.
काय आहे हाय नन्नाची कथा?
'हाय नन्ना' एक रोमँटिक कथा आहे. वडील आणि मुलीचे नाते खूप सुंदरपणे दर्शवले आहे. विराज (नानी) जो एक प्रोफेशनल फोटोग्राफर असतो आणि तो त्याची मुलगी माही (कियारा) चा सांभाळ एकटा करत असतो. माहीला हे जाणून घ्यायचं असतं की, त्याची आई कोण आहे? पण, विराज हा प्रश्न नेहमी दुर्लक्षित करत असतो. अखेर, तो याशना (मृणाल ठाकुर) ला भेटल्यानंतर माहीला तिच्या आईबद्दल सर्व काही सांगतो.