MPL 2023 : कोल्हापूर टस्कर्सला हरवून रत्नागिरी जेटस् अंतिम फेरीत

MPL 2023 : कोल्हापूर टस्कर्सला हरवून रत्नागिरी जेटस् अंतिम फेरीत
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर 1 लढतीत धीरज फटांगरेच्या उपयुक्त 46 धावांच्या खेळीसह विजय पावले (2-22) ने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेटस् संघाने कोल्हापूर टस्कर्स संघाचा डकवर्थ लुईस नियमानुसार 4 धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत धीरज फटांगरेने आक्रमक सुरुवात करत 26 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. त्यात 6 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. रत्नागिरीची 6 षटकांत 3 बाद 44 अशी धावसंख्या असताना पुन्हा पाऊस सुरू झाला. विश्रांतीनंतर रत्नागिरीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. किरण चोरमलेने 22 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 34 धावा चोपल्या. (MPL 2023)

किरण चोरमलेला फिरकीपटू अक्षय दरेकरने त्रिफळा बाद, तर श्रेयश चव्हाणने धीरज फटांगरेला झेल बाद करून रत्नागिरीच्या जम बसलेल्या फलंदाजांना बाद केले व त्यांच्या धावगतीस ब्रेक लावला. दिव्यांग हिंगणेकरने 17 चेंडूंत नाबाद 25 धावांची खेळी करत संघाला 15 षटकांत 8 बाद 136 धावांचे आव्हान उभे करून दिले; 6 व्या षटकानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियसमानुसार कोल्हापूर संघाला 15 षटकांत 135 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.

135 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला कोल्हापूर टस्कर्स संघाच्या केदार जाधवने जोरदार फटकेबाजी करत 37 चेंडूंत 55 धावांची खेळी केली. त्यात 4 षटकार व 2 चौकारांचा समावेश होता. त्याला अंकित बावणेने 18 धावा काढून साथ दिली. सिद्धार्थ म्हात्रे (13 धावा), नौशाद शेख (3 धावा), तरणजित ढिलोन (नाबाद 10) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. रत्नागिरीच्या विजय पावले (2-22), अझीम काझी (1-18) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news