MP Rape Crime : संतापजनक! 12 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; गुप्तांगात कठीण वस्तू घालून अत्याचार

MP Rape Crime : संतापजनक! 12 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; गुप्तांगात कठीण वस्तू घालून अत्याचार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : MP Rape Crime : महिलांवरील अत्याचारांच्या घटनामुळे देश हादरला आहे. एका 12 वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून अतिशय क्रूर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी चिमुकलीचा बलात्कार करून तिच्या अंगावर मोठ्या प्रमाणात चावे घेतले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठला. चिमुकलीच्या गुप्तांगात कठीण वस्तू घालण्यात आल्याची माहिती उघडकीस येत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर शहरातील आहे. आरोपी हे मैहर शहरातील एका प्रसिद्ध मंदिराच्या व्यवस्थापन ट्रस्टशी संबंधित आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पीडित चिमुकलीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
इंडिया टुडेने पीटीआयच्या माहितीनुसार याचे वृत्त दिले आहे. दिलेल्या वृत्तानुसार, रवींद्र कुमार आणि अतुल भडोलिया अशी आरोपींची नावे आहेत.

MP Rape Crime : चिमुकलीला आमिष दाखवून निर्जनस्थळी नेले; नंतर बलात्कार

घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, ही घटना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या मैहर या मंदिरात गुरुवारी घडली. आरोपींनी मुलीला आमिष दाखवून एका निर्जनस्थळी नेले. जिथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि मारहाण केली. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दोघांना अटक केली, असे मैहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी लोकेश डाबर यांनी सांगितले.

प्राथमिक तपासणीत या चिमुकलीच्या गुप्तांगात कठीण वस्तू घातल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच आम्ही याची पुष्टी करू शकतो. मुलीला प्रचंड रक्तस्राव झाल्याने तिला उपचारांसाठी विभागीय मुख्यालय रीवा येथील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती ठीक होत आहे. आम्ही अद्यापही वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत, असे सतना पोलीस अधीक्षकांनी आशुतोष गुप्ता यांनी पीटीआयला फोनवरून दिली.

अधिक माहिती देताना गुप्ता म्हणाले, आम्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई करत आहोत. दोन्ही आरोपी 30 वयोगटातील आहे. दोन्ही आरोपींना शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर आयपीसी कलम ३७६ (बलात्काराची शिक्षा), ३७६डीबी (१२ वर्षांखालील महिलेवर सामूहिक बलात्काराची शिक्षा), ३६६अ (अल्पवयीन मुलीची खरेदी), ३२३ (स्वच्छेने दुखापत करणे), ३२४ (स्वैच्छेने दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक शस्त्रे किंवा साधने), 34 (सामान्य हेतू) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यातील संबंधित तरतुदी, पोलिसांनी सांगितले.

MP Rape Crime : घटनेवर शारदा देवी मंदिर समितीने स्टेटमेंट जारी केले

दरम्यान या घटनेनंतर मां शारदा देवी मंदिर व्यवस्थापन समिती, मैहर यांनी प्रशासकाच्या स्वाक्षरीने एक स्टेटमेंट जारी केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपी रवी आणि भडोलिया यांना ट्रस्टच्या कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या असभ्य कृत्यामुळे मंदिराची प्रतिमा मलिन झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

MP Rape Crime : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे कडक कारवाईचे आदेश

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पोलिसांना आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आणि मुलीला शक्य तितके वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.

MP Rape Crime : मैहरमधील प्रकरण निर्भया प्रकरणाची आठवण करून देते – कमलनाथ

या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी घटनेचा निषेध करत हे प्रकरण दिल्लीतील 2012 च्या निर्भया प्रकरणाची आठवण करून देते. बहिणी आणि मुलींसोबत अशा घटना मध्य प्रदेशात नित्याच्याच झाल्या आहेत आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सरकार त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरले आहे, असा दावा नाथ यांनी ट्विटमध्ये केला आहे. मुलीला उत्तम वैद्यकीय उपचार आणि एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news