पुढारी ऑनलाईन डेस्क
खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल झाली असून, मंगळवारी सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत ११ वेळा धमकीचे फोन कॉल आले असल्याचे राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले होते. याप्रकरणी पाेलिसांनी नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवि राणा यांना अटक केली. काही दिवसांपूर्वीच त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. यानंतर राणा दाम्पत्य दिल्ली येथे वास्तव्यास आले.
धमकी प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहायकांनी दिल्ली पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्य म्हटलं आहे की, राणा यांना मंगळवारी सायंकाळी मोबाईल फोनवर ११ कॉल आले. यावेळी फोन करणार्या व्यक्तीने राणा यांना शिवीगाळ केली. तसेच महाराष्ट्रात परत जा, तुम्ही हनुमान चालीसाचे पठन केल्यास हत्या केली जाईल, अशीही धमकीही दिली. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नार्थ एवेन्यू पोलिस ठाण्यातील अधिकार्यांनी दिली.
हेही वाचा :