Kantara Chapter 1 : कांतारा-२ चा जबरदस्त लूक, ऋषभ शेट्टी हाती त्रिशूल घेऊन…

rishabh shetty kantara 2
rishabh shetty kantara 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कमी बजेटमधील (Kantara Chapter 1) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करून गेला. कांतारा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता ऋषभने चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली होती. जो खऱ्या अर्थाने या चित्रपटाचे प्रीक्वल असणार आहे. आज 'कांतारा २' चा पहिला लूक कर्नाटकातील कुंडापुरा येथील एका ऐतिहासिक मंदिरात रिलीज करण्यात आला. (Kantara Chapter 1)

संबंधित बातम्या –

जबरदस्त अवतारात ऋषभ शेट्टी

'कांतारा २' च्या फर्स्ट लूक पोस्टरवर ऋषभ शेट्टी जबरदस्त अवतारात दिसत आहे. अभिनेता ऋषभच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात रक्ताने माखलेला भाला दिसत आहे. ऋषभ शेट्टीचा हा दमदार अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

३०० इ.स. वर आधारित चित्रपट

ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाची कहाणी ३०० इस. वर आधारित आहे. 'कांतारा २' मध्ये देवता पंजुरली मूळ कहाणी दाखवण्यात येईल. यावर्षी फेब्रुवारीमध्ये 'कांतारा' प्रीक्वलची घोषणा करण्यात आली होती. ऋषभ शेट्टीने पुष्टी केली होती की, प्रेक्षकांनी पहिला चित्रपट जो पाहिला तो 'भाग दोन' होता आणि आता आगामी चित्रपट हा मुळात 'कांतारा'चा प्रीक्वल असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news