IFFI 2023 : दु:खाला सामोरे जायची ताकद ‘ लुटो’ देतो- दिग्दर्शक आंद्रेस आरो

दिग्दर्शक आंद्रेस आरो
दिग्दर्शक आंद्रेस आरो
Published on
Updated on

पणजी

लोकांच्या मृत्यूची मला कधीच भीती वाटली नाही, मात्र माझ्या लोकांच्या मृत्यूची, त्यांच्या दु:खाची भीती वाटते. माझ्यासाठी लुटो हा चित्रपट दु:खाला सामोरे जायची ताकद देतो, असे प्रतिपादन दिग्दर्शक आंद्रेस आरोची यांनी केले. (IFFI 2023) 'लुटो' या मेक्सिकन चित्रपटाच्या टीमने ५४ व्या इफ्फीच्या निमित्ताने माध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला. डॉक्यु-मॉन्टेज श्रेणी अंतर्गत ५४ व्या इफ्फीमध्ये लुटोचा वर्ल्ड प्रीमियर झाला. पॅनेलमध्ये दिग्दर्शक आंद्रेस आरोची टिनाजेरो, निर्माता सॅंटियागो ट्रॉन, अभिनेत्री डॅनिएला वाल्डेझ आणि अभिनेता रॉड्रिगो अझुएला यांचा समावेश होता. (IFFI 2023)

स्पॅनिश भाषेत प्रदर्शित झालेला ११० मिनिटे कालावधीचा हा चित्रपट, दु:खाचा वेध घेतो. तो मेक्सिकोमध्ये चित्रित केला असून लोक श्रद्धा, पंथ आणि धर्म यासह दुःखाच्या विविध टप्प्यांमधून कसे जातात हे त्यात दाखवले आहे.

ते म्हणाले, ते म्हणाले . "मेणबत्ती लावणे असो, तुमच्या गावी जाणे असो, प्रार्थना करणे असो किंवा तुमचा आवडता पदार्थ शिजवणे असो, हे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या हृदयात त्याला काय करायचे हे माहित असते आणि ते करण्यासाठी त्यांना त्यांच्या भीतीचा सामना करणे आवश्यक आहे आणि हिच दु:खाची ताकद आहे, अस्पर्श अशा प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे.

अभिनेता रॉड्रिगो अझुएला म्हणाले, दुःखाचा सामना करणे खूप कठीण आहे. त्यामुळे सन्मानाने आणि आनंदाने दुःखाला सामोरे जाण्याबाबत यात अधिक भर दिला आहे. दु:ख म्हणजे तुम्ही प्रेमासाठी दिलेली किंमत असते.

अभिनेत्री डॅनिएला म्हणाल्या, मी स्वतःला भावनांमधून जाऊ देते. त्यामुळे मन हलके होते. हे कठीण आहे, मात्र टीम मला ऊर्जा परत मिळवण्यास मदत करते."

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर होणाऱ्या दुःखाबद्दल बोलताना निर्माता सॅंटिआगोने नमूद केले की संपूर्ण मेक्सिकोमध्ये 'डे ऑफ द डेड साजरा केला जातो. 'डे ऑफ द डेड' ही कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची मेक्सिकन परंपरा आहे जिथे मृत पूर्वज हे सन्माननीय पाहुणे असतात. मृत प्रियजनांचे स्मरण करण्याचा आणि त्यांची आठवण काढून हा दिवस साजरा केला जातो.

आंद्रेस म्हणाले की, "देशातील प्रत्येक भाग हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. माया संस्कृतीत मृत्यूनंतरचे जीवन आहे आणि मेक्सिकोमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत.

चित्रीकरणासाठी मेक्सिकोमध्ये प्रवास करताना आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, अनोळखी लोकांचे स्वागत करणे आणि आपले अनुभव एकमेकांना सांगणे, या बाबतीत भारत आणि मेक्सिको दोन्ही देश सारखेच आहेत.

५४ व्या इफ्फीमधील डॉक्यु-मॉन्ताज विभाग

डॉक्यु-मॉन्ताज विभागात जगभरातील आकर्षक माहितीपटांचा एक संच बनवण्यात आला आहे. भारताचा ऑस्कर प्रवेश चिन्हांकित करण्यासाठी यावर्षी हा विभाग सादर करण्यात आला आहे. चित्रपटनिर्मितीमधील माहितीपटांचे वाढते महत्त्वही तो अधोरेखित करतो. ५४ व्या इफ्फीमध्ये प्रदर्शनासाठी या श्रेणी अंतर्गत दहा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news