कोल्हापूर: डॅनियल काळे; 'माझं आयुष्य आज सार्थकी लागलं…' आपल्या मुलीला डोळे भरून पाहताना सुनीताचे हे शब्द आनंदाश्रूंनी थबथबले होते. सुनीताने 28 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने पती प्रतीकच्या साथीने किती मोठी लढाई जिंकली. (Motherhood in Cancer
पुण्यातील सुनीता आणि प्रतीक यांचे 2010 मध्ये लग्न झाले. अनेक वर्षे अनेक उपचार करूनही त्यांना अपत्य काही होत नव्हते. त्यामुळे त्यांनी उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाच सुनीताला खाताना घशात त्रास होऊ लागला. मुलासाठीचे उपचार सोडून त्यांनी या समस्येवर उपचार सुरू केले. त्यावेळी सुनीताला लिम्फोमा नावाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. (Motherhood in Cancer)
'जेव्हा मला कॅन्सरचे निदान झाले, तेव्हा मला वाटत नव्हते की मी जगेन. आई होण्याची इच्छा होती; पण ती कधी पूर्ण होईल, अशी आशा आता राहिली नव्हती', सुनीता सांगते. या सगळ्या काळात प्रतीक तिच्या मागे पहाडासारखा उभा होता. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी असा प्रचंड वेदनादायी प्रवास सुरू झाला. तीन वर्षांच्या अथक संघर्षानंतर त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली. आता तुम्ही पूर्ण बर्या झाल्या आहात. हे डॉक्टरांचे वाक्य कानावर पडताच, सुनीताची मातृत्वाची इच्छा पुन्हा जागृत झाली. (Motherhood in Cancer)
डॉक्टरांनी होकार देताना कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलचा संदर्भ दिला. डॉ. श्वेता पत्की यांनी डॉ. उज्ज्वला पत्की आणि डॉ. सतीश पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली आय.व्ही.एफ. उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याला लवकरच यश आले.
डॉ. पत्की यांच्या उपचारामुळेच अपत्यप्राप्ती : आम्ही सतत 12 वर्षे संघर्ष केला, विविध उपचार केले, कोल्हापुरात पत्की हॉस्पिटलमध्ये केलेल्या उपचारामुळे आम्हाला अपत्य प्राप्तीचा हा आनंद मिळाला. यासाठी पत्की हॉस्पिटल आणि त्यांच्या टीमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत, असे या दाम्पत्याने दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.
कॅन्सर ट्रीटमेंटमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात, अशा स्थितीत प्रेग्नन्सी यशस्वी करणे हे वैद्यक शास्त्रीयद़ृष्ट्या आव्हान असते. सुनीताचा संघर्ष आणि जिद्द खूप मोठी आहे, त्यामुळे हे झाले. – डॉ. सतीश पत्की
मातृत्वाच्या वाटेत आलेल्या कॅन्सरसारख्या जीवघेण्या अडथळ्यावर मात करणार्या सुनीताची ही घटना स्त्री जातीच्या संघर्षाची गोष्ट आहे. म्हणूनच महिलादिनासाठी यासारखी प्रेरणादायी गोष्ट असू शकत नाही. – डॉ. उज्ज्वला पत्की
हेही वाचा: