धक्कादायक ! आईनेच केला 8 महिन्यांच्या बाळाचा नाक-तोंड दाबून खून

File Photo
File Photo
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : आईने स्वतःच्या आठ महिन्यांच्या मुलाचे नाक-तोंड दाबून खून केला. त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास चिखली येथील नेवाळेवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी पतीने चिखली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी कामावर असताना त्यांची पत्नी, आई, लहान बहीण आणि लहान मुलगा घरी होते. दरम्यान, त्यांच्या पत्नीने आठ महिन्यांच्या बाळाचे नाक- तोंड दाबून त्याचा खून केला. त्यानंतर तिने आपल्या हाताची नस कापून घेत स्वतःला बाथरूममध्ये बंद केले. घरच्यांनी तिला कसेबसे बाहेर काढत दवाखान्यात दाखल केले. चिखली पोलिसांनी पंचनामा केला असून, महिलेने असे का केले? याचा उलगडा झालेला नाही. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

आरोपी महिला मानसिक रुग्ण?

आरोपी महिला मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, काही तपासण्या केल्यानंतरच याबाबत निश्चित सांगण्यात येईल, असे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news