Morroco vs France : पराभव लागला जिव्‍हारी…मोरोक्‍कोच्‍या चाहत्‍यांकडून फ्रान्‍समध्‍ये जाळपोळ, पोलिसांवरही हल्‍ला

पॅरीसमध्‍ये मोरोक्‍कोच्‍या समर्थकांनी जाळपोळ केली.
पॅरीसमध्‍ये मोरोक्‍कोच्‍या समर्थकांनी जाळपोळ केली.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोवर २-० असा (Morroco vs France ) विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा पराभव जिव्‍हारी लागलेल्‍या मोरोक्‍कोच्‍या चाहत्‍यांनी रस्‍त्‍यावर उतरुन धिंगाणा घातला. ब्रसेल्‍स आणि पॅरीस शहरांमधील रस्‍त्‍यावर उतरत त्‍यांनी वाहने पेटवून दिली. या वेळी मोरोक्‍कोच्‍या समर्थकांनी पोलिसांवरही हल्‍ला केला.

मीडिया रिपोर्टनुसार, उपांत्‍य सामन्‍यातील पराभवानंतर मोरक्‍कोचे चाहते ब्रसेल्‍समधील दक्षिण स्‍टेशनबाहेर जमले. येथे
त्‍यांनी वाहने पेटवून दिली. स्‍थानिक पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला. अश्रूधुराच्‍या कांडा फोडत गर्दी पांगलवी. दरम्‍यान, पॅरीसमध्‍ये सामन्‍यानंतर जल्‍लोषण करणार्‍या फ्रान्‍सच्‍या समर्थकांसह पोलिसांवर हल्‍ला केला. अतिरिक्‍त दलाने परिस्‍थिती नियंत्रणात आणली. जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी मोरोक्‍कोच्‍या काही समर्थकांना अटक केली आहे.

Morroco vs France : फ्रान्‍स सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत

शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोवर २-० अशा गोल (France vs Morroco) फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला फ्रान्ससाठी थियो हर्नांडेझने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर ७९ व्या मिनिटाला रँडल कोलो मुआनीने गोल करत संघाची आघाडी भक्कम केली. मोरोक्कोला सामन्यात एकही गोल करता आला नाही. यामुळे त्यांचा फ्रान्सने २-० ने पराभव केला. फ्रान्‍सने सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात फ्रान्सचा मुकाबला अर्जेंटिनाशी होणार आहे. हा सामना रविवारी (दि १८) रोजी रात्री ८.३०ला सुरु होणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news