एअर इंडिया एक्सप्रेसची ७० विमान उड्डाणे रद्द, कर्मचारी सामुहिक रजेवर

Air India Express
Air India Express

पुढारी ऑनलाईन डेस्क : एअर इंडिया एक्स्प्रेसचे वरिष्ठ कर्मचारी आजारी अचानक सामुहिक रजेवर गेले आहेत. परिणामी, एअर इंडिया एक्स्प्रेसने ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत रद्द केली. दरम्यान, आमच्या केबिन क्रू मेंबर्सचा एका विभाग काल रात्री अचानक आजारी रजेवर गेला. परिणामी, विमान उड्डाणांना विलंब झाला असून ती रद्द करण्यात आली असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसचे प्रवक्त्याने म्हटले आहे.

"आमच्या केबिन क्रूच्या एका विभागाने काल रात्री अचानक शेवटच्या क्षणी आजारी असल्याची नोंद केली. परिणामी, विमान उड्डाणांना विलंब झाला असून ती रद्द करण्यात आली आहेत. या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी चर्चा करत आहोत. आमच्या टीम्स सक्रियपणे या समस्येकडे लक्ष देत आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत. विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर संबंधित प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत केले जातील. तसेच वेळापत्रकात बदल केला जाईल. विमानतळावर जाण्यापूर्वी विमान सेवा सुरु आहे की नाही, हे तपासावे", असे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यानी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसची मालकी आता टाटा समूहाकडे आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने डिसेंबर २०२३ मध्ये या एअरलाइनचे व्यवस्थापन आणि केबिन क्रू सदस्यांमधील वादाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ही नोटीस केबिन क्रू सदस्यांच्या प्रश्नाशी संबंधित होती, ज्यात लेओव्हर दरम्यान रूम शेअरिंगच्या समस्यांचा समावेश होता.

एअर इंडिया एक्सप्रेस एम्प्लॉईज युनियन (AIXEU) ने केबिन क्रू सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध तक्रारींबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर एक महिन्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news