पुढारी ऑनलाइन डेस्क : Job Offer : IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या 50 हून अधिक विद्यार्थ्यांना देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांमध्ये 1 कोटी पेक्षा अधिकचे पॅकेज असलेल्या नोकरीचे ऑफर्स मिळाले आहेत. सध्या टेक क्षेत्रात सुरू असलेल्या मंदीच्या काळात आणि टॉप कंपन्या कर्मचारी कपात करत असताना आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या जॉब ऑफर्स मुळे दिलासादायक चित्र दिसत आहे.
Job Offer : आयआयटी दिल्लीमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्लेसमेंट हंगाम सुरू झाला आहे. 1 आणि 2 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या कॅम्पस मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांनी 650 पूर्ण वेळ नोकरीच्या ऑफर स्वीकारल्या होत्या. तर 550 युनिक नोक-या निवडल्या होत्या. यामध्ये 250 हून अधिक प्री-प्लेसमेंट ऑफर समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी नोकरीच्या ऑफर प्राप्त होण्याच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Job Offer : कंपन्या आणि जॉब प्रोफाइल
या कॅम्पसमध्ये देश-विदेशातील टॉपच्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बजाज ऑटो, बोस्टन कन्सलटिंग ग्रुप, एनफेस सोलर एनर्जी, इंटेल प्रॅक्सिस ग्लोबल अलायन्स आणि स्ट्रॅटेजी अमेरिकन एक्सप्रेस इत्यादी कंपन्यांनी विद्यार्थ्यांना जॉब ऑफर केल्या आहेत.
कॅम्पस मध्ये 20 विद्यार्थ्यांना युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान, हाँगकाँग आणि युनायटेड स्टेट्स या देशांतून नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.
Job Offer : कॅम्पसमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांतील जॉब ऑफरपैकी देशांतर्गत जॉब ऑफर्स स्वीकारण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त CTC सह देशांतर्गत ऑफर स्वीकारल्या आहेत. यावर्षी भर्ती प्रक्रिया प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही प्रकारे केली जात आहे.
हे ही वाचा :