बॉक्स ऑफिसची दिवाळी !!! या वीकेंडला 2 कोटीहून अधिक लोकांनी मोठ्या पडद्यावर पहिले सिनेमे

बॉक्स ऑफिसची दिवाळी !!! या वीकेंडला 2 कोटीहून अधिक लोकांनी मोठ्या पडद्यावर पहिले सिनेमे

पुढारी ऑनलाईन : कोविड महामारीमुळे रुपेरी पडदा, मल्टिप्लेस आणि सिंगल स्क्रीन मालकांच्या व्यवसायावर बहुतांश परिणाम झाला होता. त्यातच ओटीटी माध्यमांचं प्राबल्य वाढल्याने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणाऱ्या वर्गाचं प्रमाण पर्यायाने कमी झालं होतं. पण सिनेमागृहांचा हा दुष्काळ संपताना दिसतो आहे. या वीकेंडला बॉक्स ऑफिसची शब्दश : दिवाळी झाली असून मागील काही वर्षांचा दुष्काळ या निमित्ताने संपला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

रजनीकांत स्टारर जेलर आणि सनी देओलचा गदर 2, अक्षय कुमारचा OMG 2 आणि रणवीर सिंगचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवरील प्रभावाने प्रेक्षकांना चांगलंच आकर्षित केलं आहे. विशेष म्हणजे जोडून आलेल्या सुट्ट्यांनी हा रेकॉर्ड बनायला मदतच केली. प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, 11 ते 13 ऑगस्ट हा कोविड महामारीनंतरचा सर्वात व्यस्त वीकेंड होता. तर या तीन दिवसांतील तिकिट विक्रीनेही रेकॉर्ड केला आहे. या तीन दिवसांत जवळपास 390 कोटींची तिकिटे विकली गेली. त्यामुळेच हा विकेंड ऑल-टाइम थिएटरिकल ग्रॉस रेकॉर्ड बनला आहे.

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशीष सरकार यांच्या मते, "मुख्य प्रवाहातील कथाकथनाने योग्य पद्धतीने कार्यान्वित केल्यामुळे बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. फिल्म मेकिंग टीमचा परिणाम आहे, ज्यामध्ये कलाकार आणि क्रू एकत्र येऊन खरोखरच खास चित्रपटाचा अनुभव तयार करतात. प्रेक्षक इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत की अगदी पहाटेचे शो देखील विकले जात आहेत."

हेही वाचा  :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news