मोरबी दुर्घटनेने गुजरातवर शोककळा; मृतांचा आकडा १३३ वर; एजन्सीवर गुन्हा दाखल, पंतप्रधान मोदींचा रोड शो रद्द

मोरबी दुर्घटनेने गुजरातवर शोककळा; मृतांचा आकडा १३३ वर; एजन्सीवर गुन्हा दाखल, पंतप्रधान मोदींचा रोड शो रद्द

पुढारी ऑनलाईन: गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील 'केबल ब्रिज' अचानक तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत 133 हून लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर यामध्ये ९३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेने गुजरातवर मोठी शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचत सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहत कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त केली.

यानंतर मोरबी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सोमवारी अहमदाबादमध्ये होणारा रोड शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या आभासी उपस्थितीत होणारा पेज कमिटी स्नेह मिलन कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गुजरात भाजप मीडिया सेलने रविवारी संध्याकाळी उशिरा दिली आहे.

एजन्सीवर गुन्हा दाखल

गुजरातमधील या 'केबल ब्रिज' चे काम करणाऱ्या एजन्सीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मोरबी विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाशभाई देकावडिया यांनी दिली आहे. या एजन्सीविरूद्ध भारतीय दंड संहितेतील कमल ३०४, कलम ३०८ आणि कलम ११४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत

मोरबी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाख रूपायांची तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news