अदानी समूहाला आता ‘मूडीज’चा धक्का, ४ कंपन्यांच्या मानांकनात केला बदल

गौतम अदानी ( संग्रहित छायाचित्र)
गौतम अदानी ( संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्स घसरणीनंतर आता जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने (Global ratings agency Moody's Investor Service) अदानी समूहाच्या चार कंपन्यांचा रेटिंग आउटलूक बदलला आहे. या कंपन्यांचा आउटलूक स्थिर वरून नकारात्मक केला आहे. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चनेच्या त्यांच्या रिपोर्टमधून अदानी समूह स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊन मोठा आर्थिक फटका बसला.

आता जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने अदानी समूहाच्या (Adani Group companies चार कंपन्यांचा मानांकनात बदल केला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड ग्रूप (AGEL RG-1), अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन लिमिटेड आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांच्या रेटिंगचा आउटलूक स्थिर बदलून नकारात्मक केला आहे.

मूडीजने मात्र अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड ग्रूप (AGEL RG-2) आणि अदानी ट्रान्समिशन रिस्ट्रिक्टेड ग्रूप १ चा स्थिर असलेला आउटलूक कायम ठेवला आहे.
"हिडेंनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजार समभाग मूल्यांमध्ये मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या चार कंपन्यांचा मानांकनात बदल केला आहे," असे मूडीजने म्हटले आहे.

हिंडेनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले आणि यामुळे ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news