पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून संदर्भात अंदाज देण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, हिंद महासागर द्विध्रुव (IOD) आणि ला नीना परिस्थितीच्या एकाचवेळी सक्रियतेमुळे या वर्षी मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे. तसेच देशातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पावसासह धुवांधार मान्सूनची संभाव्यत: तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Monsoon Updates)
'ला निना' प्रभाव एक आवर्ती हवामान घटना आहे. जी मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर द्विध्रुव (IOD) मधील समुद्राच्या पृष्ठभागाच्या सरासरीपेक्षा थंड तापमानामुळे होते. तसेच हिंद महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील चढउतारामुळे La Nina चा परिणाम सर्वाधिक दिसून येतो. (Monsoon Updates)
महासागर द्विध्रुव (IOD) आणि ला नीना या परस्परसंबंधित दोन्ही घटनेच्या गतिशीलतेचा नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनवर लक्षणीय प्रभाव पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संशोधकांना डायनॅमिकल मॉडेल्सचे परिष्कृत करण्यासाठी आणि प्रगत पर्जन्य-सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी भरपूर डेटा गोळा करण्याची एक संधी मिळेल, असेदेखील हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Monsoon Updates)
ला नीना परिस्थिती आणि हिंद महासागरातील द्विध्रुव घटनाची निरीक्षणे मुख्य मान्सून अभिसरण क्षेत्रामध्ये पश्चिमेकडे वळवण्याच्या दिशेने निर्देश करतात. यामुळे भारतीय किनारपट्टीजवळील अरबी समुद्रातून मान्सूनच्या प्रतिक्रियेला सुरूवात होते. दरम्यान, महासागरात मोठ्या प्रमाणावर ऊर्ध्वगामी गती निर्माण होते जी प्रचलित मान्सून प्रणालीला पोषक ठरते, तसेच संपूर्ण हंगामात अधिक पावसाचे संकेत देते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
हे ही वाचा: