पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या आठवड्यात १९ मे रोजीच मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. परंतु ३० मे पर्यंत मान्सूनच्या स्थितीमध्ये कोणतीही प्रगती झाली नव्हती. परंतु गेल्या ११ दिवसांपासून अंदमानातच थांबल्यानंतर आता मात्र मान्सून (monsoon update) नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने नुकतीच दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर, गेले ११ दिवसांमध्ये त्यामध्ये कोणताही सकारात्मक बदल झाला नव्हता. पण सध्या अंदमानातील मान्सून (monsoon update) बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून पुन्हा या प्रदेशाच्या काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे देखील IMD ने म्हटले आहे.
यंदा केरळमध्ये मान्सूनला सुरुवात होण्यास थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतीय राज्यावर मान्सूनच्या पावसाची सुरुवात ४ जून रोजी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ४ दिवस मागे पुढे होऊ शकते, सध्या मान्सून (monsoon update) बंगालच्या उपसागरात असून तो हळूहळू प्रगती करीत आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.