Monsoon Update : पंचांगानुसार यंदा सरासरी एवढा पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पंचांगाप्रमाणे यावर्षी सर्वसाधारणपणे सरासरी एवढा पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केला. (Monsoon Update 2023)

गुरुवार (8 जून) सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचे वाहन 'हत्ती' असल्याची माहितीही त्यांनी दिली. वेधशाळा नव्हत्या, कृत्रिम उपग्रह नव्हते. त्यावेळेपासून शेतकरी पंचांगातील पर्जन्य नक्षत्र वाहनांवरून पावसाचा अंदाज जाणून घेत असत. हे अंदाज कधी बरोबर यायचे तर कधी चुकायचे. आता मात्र आधुनिक वेधशाळांचे अंदाज बरेचसे अचूक येतात, असे सोमण यांनी स्पष्ट केले. (Monsoon Update 2023)

पर्जन्य नक्षत्रांची वाहने कशी ठरविली जातात, याबाबत माहिती देताना ते म्हणाले, सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्र संख्या मोजली जाते. या संख्येस 9 ने भागावे, उरलेल्या बाकीवरून वाहन ओळखले जाते. (Monsoon Update)

ही बाकी 1 असल्यास घोडा, 2 कोल्हा, 3 बेडूक, 4 मेंढा, 5 मोर, 6 उंदीर, 7 म्हैस, 8 गाढव आणि शून्य बाकी राहिली तर हत्ती वाहन समजण्याची प्रथा असल्याचे ते म्हणाले. (Rain In Maharashtra 2023)

पावसाची मजेशीर नावे | Maharashtra Weather Update By Constellation

प्राचीनकाळापासून पावसाला मजेशीर नावे देण्यात आली आहेत. पुनर्वसू नक्षत्रात पडणार्‍या पावसाला 'तरणा पाऊस' तर पुष्य नक्षत्राच्या पावसाला 'म्हातारा पाऊस' म्हणतात. आश्लेषा नक्षत्राचा पावसाला 'आसळकाचा पाऊस' म्हणतात. मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो म्हणून मघा नक्षत्रात पडणार्‍या पावसाला 'सासूंचा पाऊस' म्हणतात. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणार्‍या पावसाला'सुनांचा पाऊस' तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणार्‍या पावसाला 'रब्बी'चा तर हस्त नक्षत्रात पडणार्‍या पावसाला 'हत्तीचा पाऊस' असे म्हणतात. चित्रा नक्षत्रात पडणार्‍या पावसाला 'आंधळीचा पाऊस' म्हणतात. (Rain in Maharashtra IMD Predict)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news