मान्सून पुढील 48 तासांत केरळमध्ये दाखल होणार

मान्सून पुढील 48 तासांत केरळमध्ये दाखल होणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मान्सून आगामी 48 तासांत केरळमध्ये दाखल होईल, असा दावा पुणे येथील हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.के. एस. होसाळीकर यांनी केला आहे.

होसाळीकर यांनी काही वेळापूर्वीच ट्वीट करत ही बातमी दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की ,दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्याचा प्रभाव, तसेच तेथील वाऱ्याच्या उंचीत वाढ झाली आहे.वाऱ्याचा वेग खालच्या थरात जास्त होता, तो आता वरच्या थरातही जास्त आहे. तसेच अरबी समुद्र, लक्षव्दीप, केरळ किनारपट्टीवर ढगाळ वातावरण तयार झाल्याने आगामी 48 तासांत केरळ मध्ये मान्सून दाखल होईल.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news