Modi and zelenskyy : पीएम मोदींनी फोन पे चर्चा केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले ?

Modi and zelenskyy : पीएम मोदींनी फोन पे चर्चा केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले ?

कीव्ह, पुढारी ऑनलाईन : युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमीर झेलेन्स्की (Modi and zelensky) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवादादरम्यान आभार मानले. झेलेन्स्की यांनी ट्विट करून सांगितले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाविरोधात होत असलेल्या युद्धात युक्रेनकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरासंदर्भाता माहिती दिली आहे. भारतीय नागरिकांना दिली जाणारी मदत आणि उच्च स्तरावर केली जाणाऱ्या चर्चेतील युक्रेनच्या वचनबद्धतेचं कौतुक केले आहे."

झेलेन्स्की यांनी ट्विट करून म्हटे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाने केलेल्या लष्करी कारवाईविरोधात युक्रेन करत असलेल्या प्रतिकाराची माहिती दिली. युक्रेनने भारतीय विद्यार्थ्याच्या सुटकेसाठी केलेल्या सहकार्याचे भारताने कौतुक केले. युक्रेन सर्वोच्च पातळीवर शांततेत चर्चा करण्यासाठी कटिबद्ध आहे. युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे.

दरम्यान, युनोमधील रशियाविरोधातील मतदानवेळी भारताने अलिप्‍त भूमिका बजावली. युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की यांनी भारताकडे राजकीय समर्थन मागितले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी शांतता प्रस्‍थापित होण्‍यासाठी योगदान देण्‍याचेही आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी यांनी तत्‍काळ युद्ध समाप्‍त व्‍हावे, असे आवाहन केले आहे.

रशिया–युक्रेन युद्ध सुरु झाल्‍यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वरिष्‍ठ अधिकार्‍यांबरोबर अनेक बैठका केल्‍या आहेत. मागील आठवड्यात ऑपरेशन गंगाच्‍या माध्‍यमातून १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले आहे. खार्किव्‍ह आणि सूमी या दोन शहरात अडकेल्‍या भारतीय नागरिक आणि विद्यार्थी वगळता जवळपास सर्व भारतीयांना युक्रेनमधून परत आणण्‍यात आले आहे. (Modi and zelensky)

रशिया – युक्रेन युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरातील हल्‍ले आणखी तीव्र केले आहेत. खार्किव्‍हमध्‍ये नागरी वस्‍तींवर हल्‍ले होत आहेत. आज रशिया आणि युक्रेनच्‍या प्रतिनिधींची चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. आज होणार्‍या चर्चेत युद्ध विरामावर चर्चा होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

पहा व्हिडिओ : व्यथा कांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या झोरे कुटुंबाची…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news