Urfi Javed : एवढचं बाकी राहिलं होतं! उर्फीचा फ्लॉवर बिकिनी ड्रेस

urfi javed
urfi javed
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेदची (Urfi Javed ) फॅशन आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. तिच्या नव्या नव्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. आताही तिचा नवा फॅशन व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. हा व्हिडिओ पाहून भल्याभल्यांची बोलती मात्र बंद झालेली दिसते. उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे नाव घेताच त्यांचे फाटलेले आणि उघड कपडे मनात येऊ लागतात. बोल्ड कपडे आणि स्टाईलने लोकांचा घाम फोडणारी उर्फी जावेद आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Urfi Javed )

यावेळी ती फ्लोरल प्रिंटच्या बिकिनीमध्ये नाही तर फ्लॉवर बिकिनी लूकमध्ये दिसली. हे पाहून भल्याभल्यांचा श्वास रोखला गेला. उर्फीचा हा व्हिडिओ अपलोड होऊन अवघे काही तास उलटले असून १ लाख ६१ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे.

यावेळी तिने कपड्यांऐवजी फुलांनी अंग झाकले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदची ही स्टाईल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नेटकरी या लूकवर खूप सारे कमेंट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर युजर्सनी उर्फीला ट्रोल केले

मात्र, यावेळीही उर्फी जावेदचा हा लूक सोशल मीडियावर यूजर्सना काही विशेष आवडला नाही. उर्फीला अनेकांनी ट्रोल केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, 'वैधानिक चेतावणी: – कृपया शाकाहारी प्राण्यांपासून (गाय, म्हैस, शेळी, हरिण, हत्ती) दूर राहा.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'बकरीपासून वाचून राहा दीदी.' त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिले की, 'लोकांकडे दुर्लक्ष करणे आणि आत्मविश्वासाने बोल्ड लूक देणे हे धाडसाचे काम आहे.'

अभिनेत्री उर्फी जावेद कधीही प्रसिद्धीझोतात येण्याची संधी सोडत नाही. आपल्या कपड्यांमुळे आणि वक्तव्यांमुळे उर्फी नेहमीच चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी उर्फीने जुन्या हात मोज्यांमधून एक अप्रतिम स्टायलिश ब्रा बनवली होती. तिचा या फॅशनचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news