नितीन चंद्रकांत देसाई यांनी जीवन का संपवले? समोर आले कारण…

नितीन चंद्रकांत देसाई यांनी जीवन का संपवले? समोर आले कारण…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चित्रपट क्षेत्रात कला दिग्‍दर्शक या नावाला नवी उंची देणारे नाव म्‍हणजे नितीन चंद्रकांत देसाई ( Nitin Chandrakant Desai ) आज सकाळी त्‍यांनी जीवन संपविल्‍याचे वृत्त आले आणि बॉलीवूडसह संपूर्ण महाराष्‍ट्राला धक्‍का बसला आहे. त्‍यांनी टोकाचे पाऊल का उचलेले, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यामागील कारण काय असावे, याबाबत आमदार महेश बालदी यांनी 'माहिती दिले आहे.

Nitin Chandrakant Desai : नितीन चंद्रकांत देसाई हाेते आर्थिक तणावात

'एएनआय'शी बोलताना महेश बालदी म्‍हणाले की, नितीन चंद्रकांत देसाई ( Nitin Chandrakant Desai ) हे मागील काही महिन्‍यांपासून आर्थिक तणावात होते. मागील एक महिन्‍यांपासून त्‍यांच्‍या एनडी स्‍टुडिओमध्‍ये लहान मालिकांचेच काम सुरु होते. मोठ्या प्रोजेक्‍टचे काम मिळते नव्‍हते, अशी खंतही त्‍यांनी बालदी यांच्‍याशी बोलताना व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे नितीन चंद्रकांत देसाई यांनी जीवन संपविण्‍यामागे आर्थिक संकट हेच एकमेव कारण असू शकते, असेही बालदी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Art Director Nitin Chandrakant Desai) यांच्‍या निधनामुळे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे समजते. बुधवारी तिथे ते मृतावस्थेत सापडले. त्यांच्या मृत्यूची घटना मंगळवारी रात्रीच घडली. सकाळी कामगार साफसफाईसाठी स्टुडिओत गेले असता त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आज  (दि. २ ) सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत, अशी माहिती रागयडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. घटनास्थळी कसलीही चिठ्ठी अथवा कागदपत्रे सापडलेली नाहीत. पोलिस तपास पथक घटनास्थळी शोध घेत आहेत. घटना मध्यरात्री घडली असल्याचा अंदाज आहे, असे अपर पोलिस अधिक्षक अतूल झेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news