पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट क्षेत्रात कला दिग्दर्शक या नावाला नवी उंची देणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई ( Nitin Chandrakant Desai ). आज सकाळी त्यांनी जीवन संपविल्याचे वृत्त आले आणि बॉलीवूडसह संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. बॉलीवूडला कलेचा नवा दृष्टकोन देणारे नितीन चंद्रकांत देसाई यांचा जीवनप्रवास जाणून घेवूया…
नितीन देसाई यांचा जन्म रत्नागिरीतील दापोली येथील. त्यांचे शालेय शिक्षण मुलुंड येथील मराठी माध्यमात झाले. लहानपणापासून त्यांचा ओढा कला क्षेत्राकडे होता. त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एलएस राहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले.
ख्यातनाम दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या दुरदर्शनवरील तमस या मालिकेतून १९८७ मध्ये नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शन प्रवासाला सुरुवात झाली. या मालिकेसाठी त्यांनी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनासाठी कबीर, चाणक्य आदी मालिकांसाठीही कला दिग्दर्शन केले.
नितीन देसाई यांच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीची सुरुवात १९९३ मध्ये अधिकारी ब्रदर्स यांच्या भूकंप चित्रपटाने झाली. यानंतर त्या खर्या अर्थाने ओळख दिली ती विधू विनोद चोप्रा यांच्या परिंदा या चित्रपटाने. 1942: अ लव्ह स्टोरी, देवदास, लगान, जाेधा अकबर या चित्रपटातील कामाचे विशेष कौतूक झाले.
नितीन चंद्रकांत देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट : आ गेले लाग जा, द्रोह काळ, ओ डार्लिंग! ये है भारत, अकेले आम्ही अकेले तुम, खामोशी: द म्युझिकल, कामसूत्र, दिलजले, माचीस, आर या पार, इश्क, करिब, प्यार तो होना ही था, बारूड, वजूद, सलाम बॉम्बे!, दाहेक: एक ज्वलंत आवड, हु तू तू, हम दिल दे चुके सनम, लगान, बादशाह, मेला, खौफ, जंग, जोश, मिशन काश्मीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजू चाचा, एक २ का ४, फिलहाल, देवदास, द लिजेंड ऑफ भगतसिंग, एक हिंदुस्थानी. चुपके से, ताजमहाल: प्रेमाचे स्मारक, मुन्नाभाई एमबीबीएस, मेमसाहेब, लगे रहो मुन्ना भाई, जोधा अकबर, जाना होगा क्या, गांधी माझे वडील, धन धना धन लक्ष्य, YMI ये मेरा इंडिया, देव तुसी ग्रेट हो, दोस्ताना, सास बहू और सेन्सेक्स.
नितीन चंद्रकांत देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला होता. ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटाचे कलादिग्दर्शक अशी त्यांची ओळख झाली होती.. कारण त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठीचे सर्व चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऐतिहासिक चित्रपटासाठीच मिळाले आहेत.महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार त्यांना हरिश्चंद्राची फॅक्टरी चित्रपटासाठी मिळाला होता.
आपला स्वत: स्टुडिओ असावा असे नितीन देसाई यांचे स्वप्न होते. अखंड परिश्रमातून त्यांनी ते वास्तवात उतरवलेही. २००५ मध्ये त्यांनी मुंबईजवळील कर्जत येथे त्यांनी ५२ एकर परिसता एनडी स्टुडिओ उभारला. याच स्टुडिओ त्यांनी जोधा अकबर , ट्रॅफिक सिग्नल तसेच कलरचा रिॲलिटी शो बिग बॉसचा सेट उभारला होता. त्यांना अभिनयाचीही आवड होती २०११ मध्ये, त्याने गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हॅलो जय हिंद या मराठी चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.
नितीन चंद्रकांत देसाई यांनी २००३ मध्ये देवी माँ आशापुरा या भक्तिमय चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांची निर्मिती असणार्या राजा शिवछत्रपती मलिकेने इतिहास घडवला. सर्वात लोकप्रिय मालिका अशी या मालिकेची ओळख झाली. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व या चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली होते. या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली हाेती.
हेही वाचा :