राज ठाकरेंवर कमेंट कराल तर करेक्ट कार्यक्रम करू; अमोल मिटकरींना धमकी!

अमोल मिटकरी
अमोल मिटकरी

अकोलाः पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रवक्ता तथा आमदार अमोल मिटकरी यांना राज ठाकरेंवर कमेंट कराल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करू अशा प्रकारची धमकी १ एप्रिल रोजी व्हॉट्सअपवर मिळाली आहे. या प्रकारानंतर मिटकरी यांनी स्थानिक पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करून माझ्या व कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

१ एप्रिल रोजी संध्याकाळी मिटकरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना शनिवारी (दि.१) रोजी सकाळी १०.३० वाजता व्हॉट्स्अप एक मॅसेज आला. त्यामध्ये एका व्यक्तीने धमकी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्यावर वक्तव्य करताना जरा सांभाळून करा, नाहीतर करेक्ट कार्यक्रम करू असा उल्लेख केला आहे. या प्रकारातून मला व माझ्या कुटूंबियांच्या जीवाला धोका आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने चौकशी करून संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी अशी विनंती केली आहे.

अमोल मिटकरींनी केले होते ट्टिट

दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना रामनवमी जल्लोषात साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज ठाकरे स्वत: परदेश दौ-यावर गेले. त्यामुळे आता रामनवमी कार्यकर्त्यांनाच साजरी करावयाची आहे. याला म्हणतात, हंस चुगेगा दाना तिनका, कौवा मोती खायेगा.. असा ट्टिटमध्ये उल्लेख आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news