पुढारी ऑनलाइन डेस्क : Ankita Bhandari Murder Case Uttarakhand : भाजप नेता विनोद आर्याचा मुलगा पुलकित आर्याच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या अंकिताचा मृतदेह अखेर आज (शनिवारी) सकाळी तब्बल 6 दिवसांनी सापडला आहे. ऋषिकेश मधील चिल्ला कॅनॉलमधून तिचे शव बाहेर काढण्यात आले आहे. अंकिताच्या खून प्रकरणी पुलकित आर्यासह आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपासासाठी पोलीस उपमहानिरीक्षक पी रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री पीएस धामी यांनी सांगितले आहे.
पौरी गढवालमधील नंदलसून पट्टीच्या श्रीकोट येथील रहिवासी अंकिता भंडारी (19) ही पुलकित आर्याच्या वनांतर रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. १८ सप्टेंबर रोजी ती रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. त्याच दिवशी पुलकित आर्या आणि अन्य तिघांनी तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेनंतर तब्बल 5 दिवसांनी शुक्रवारी (दि.23) पोलीस तपासात पुलकित आर्या आणि त्याच्या साथीदारांनीच अंकिताला चिल्ला कालव्यात ढकलून देऊन खून केला असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पुलकित आर्या माजी राज्यमंत्री आणि भाजप नेता विनोद आर्या यांचा मुलगा आहे. त्यामुळे उत्तराखंडात जनक्षोभ उसळला आहे. पोलिसांनी रिसॉर्टचालक पुलकित आणि त्याचे दोन व्यवस्थापकांना अटक केली. अंकिताचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी एसडीआरएफची मदत घेतली. चिला कालव्याचे पाणी बंद करण्यात आले मात्र सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह बाहेर काढता आला नाही.
अखेर आज शनिवारी सकाळी तिचा मृतदेह चिल्ला कॅनॉलमधून बाहेर काढण्यात आला. "सकाळी ७ वाजल्यापासून सर्च ऑपरेशन सुरू होते, आम्ही एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला, तिचे नातेवाईक येथे आले आणि त्यांनी तो मृतदेह अंकिता भंडारीचा असल्याची ओळख पटवली. डेडबॉडी ऋषिकेशमधील एम्समध्ये नेण्यात आले आहे." असे SDRF च्या अधिका-यांनी सांगितले.
बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता असे आढळून आले की, 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास अंकिता रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक अंकित आणि भास्कर यांच्यासोबत रिसॉर्टमधून बाहेर पडली होती. यानंतर ते तिघेही साडेदहाच्या सुमारास रिसॉर्टमध्ये परतले. अंकिता त्याच्यासोबत नव्हती. त्याआधारे पोलिसांनी तिघांची कोठडीत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.
पुलकित आर्या हा अंकिताला रिसॉर्टमध्ये येणा-या ग्राहकांसोबत संबंध ठेवायला सांगत असे. मात्र यासाठी अंकिता तयार नव्हती. पुलकित हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणत होता. त्यामुळे तिने रिसॉर्टमध्ये अनेकांना या प्रकाराबाबत सांगण्यास सुरुवात केली. तसेच रिसॉर्टचे वास्तव उघड करण्याची धमकी पुलकितला देत होती. त्यामुळे 18 सप्टेंबरच्या रात्री पुलकित तिला त्याच्या तीन व्यवस्थापकांसह बाहेर घेऊन गेला.
या प्रकरणावरून वाद निर्माण झाला होता. घटनेच्या दिवशी हे चौघे दोन वेगवेगळ्या वाहनांवरून चिऊला बॅरेजवर गेले होते. तेथे त्याने फास्ट फूडसोबत दारू प्यायली. त्यानंतर पुढे जाऊन कालव्याच्या काठावर थांबावे. इथे पुलकित आणि अंकिता पुन्हा भांडू लागले.
दरम्यान, अंकिताने पुलकितचा मोबाईल हिसकावून कालव्यात फेकून दिला. याचा राग येऊन पुलकितने अंकिताला कालव्यात ढकलून दिले. अंकिता दोनदा पाण्यातून वर आली आणि वाचवण्यासाठी आवाज उठवला. मात्र, तिघेही घाबरले आणि पळून रिसॉर्टमध्ये आले. याठिकाणी त्याने कर्मचाऱ्यांना अंकिता तिच्या खोलीत आहे अशा पद्धतीने सांगितले. काही वेळाने तिघेही महसूल पोलिस चौकीत हरवल्याची नोंद करण्यासाठी गेले.
एएसपीने सांगितले की, प्रदीर्घ चौकशीनंतर खुनाचे पुरावे मिळाले. त्यामुळे खून आणि अन्य खुनाचा पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली पुलकित आर्य (रा. स्वदेशी भवन, आर्यनगर, ज्वालापूर हरिद्वार), अंकित उर्फ पुलकित गुप्ता आर्य (रा. दयानंद नगरी, ज्वालापूर, हरिद्वार) आणि सौरभ भास्कर (रा. सूरजनगर, ज्वालापूर, हरिद्वार) तिघांना अटक करण्यात आली.
तपासणीमद्ये आर्याचे हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे समोर आले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जनतेच्या आक्राशामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी संध्याकाळी उशीरा हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले. आदेशाप्रमाणे रात्री उशिरा वनांतर रिसॉर्ट पाडण्यात आले.
हे ही वाचा :