Mira Jagannath : अद्भुत मीरा❤️, ओल्या सांजवेळी मोकळ्या केसात अप्रतिम फोटोशूट

Mira Jagannath
Mira Jagannath

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसमधून चर्चेत आलेली मीरा जगन्नाथ आता पुन्हा नव्या मालिकेत दिसणार आहे. मराठी मालिकांमध्ये अभिनय केलेल्य़ा मीरा जगन्नाथ आता आई कुठे काय करते 'या' मालिकेत दिसेल. दरम्यान, तिने सुंदर फोटोशूट केले असून तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे. (Mira Jagannath) मीराने एका खडकावर छोट्या धबधब्याच्या ठिकाणी हा फोटोशूट केला आहे. ऑरेंज स्लिव्हलेस ब्लाऊज आणि लाईट कलर साडी अशा सिंपल लूकमध्ये मोकल्या केसात तिचे फोटो क्लिक्स आहेत. (Mira Jagannath)

अरुंधती, अनिरुद्ध, आई, आप्पा आणि मुलं या पात्रांमध्ये नव्याने एक पात्र दाखल होणार आहे. या मालिकेत आता मीरा दिसणार असून तिची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याआधी मीरा येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमोच्या भूमिकेत दिसली होती. बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्येही ती दिसली. या शोमधून ही ती लोकप्रिय ठरली. तिने सर्वांचेच लक्ष या शोमधून वेधून घेतले होते. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये तिने संजनाची भूमिका साकारली होती.

मीरा उत्तम डान्सर असून तिला स्वयंपाक करण्याची आवड आहे. मीराचा जन्म २० ऑगस्ट, १९९८ रोजी मुंबीत झाला. तिने मुंबईतून आपले शिक्षण पूर्ण केले असून मुंबई विद्यापीठातून आर्ट्समधून पदवी घेतलीय. मीराने मॉडेलिंग केलं आहे. मीराने २०२० मध्ये मराठी चित्रपट इलू इलू मधून डेब्यू केलं होते. त्यानंतर तिने वेब सीरीज लाईव्ह इंडिपेडेंट मधून डिजिटल डेब्यू केलं होतं. २०१८ मध्ये ती प्रेमम जयति या म्युझिक व्हिडिओत दिसली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news