Ajay Purkar : ‘सुभेदार’ टीमने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जाऊन घेतले दर्शन (Video) | पुढारी

Ajay Purkar : 'सुभेदार' टीमने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जाऊन घेतले दर्शन (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई मंदिरात दाऊन अभिनेता अजय पुरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत ‘सुभेदार’ चित्रपटाची टीम होती. अजय पुरकर यांनी काही फोटो अपलोड केले आहेत. (Ajay Purkar ) हे फोटो अजय यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहता येतील. त्यांनी फोटोंना कॅप्शनमध्ये लिहिलंय- कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ‘सुभेदार’ टीमचा कोल्हापूर दौरा सुरु..’ (Ajay Purkar)

अभिनेता विराजस कुलकर्णीचा ‘सुभेदार’ चित्रपटातील लूक चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटात तो ‘जीवा’ या भूमिकेत दिसणार आहे. ‘सुभेदार’मध्ये मुख्य भूमिका म्हणजेच तानाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता ‘अजय पुरकर’ने साकारली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पुन्हा ‘चिन्मय मांडलेकर’ दिसणार आहे. तर ‘जिजाऊ’ आईसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान, हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण तांत्रिक अडचणीमुळे ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून २५ ऑगस्ट करण्यात आली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरे ही भूमिका अभिनेते अजय पुरकर साकारत आहेत.

चित्रपटाचे सीन शूट करताना अजय पुरकर यांना दुखापत झाल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता. अजय पुरकर म्हणाले, या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये माझ्या अंगाला लागून मशाल पडते आणि त्या मशालीवरून मला उडी मारून जायचं होतं. त्या मशालीच्या टोकाने माझ्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. पण, तसेच शूट केलं. दुखणं वाढत गेल्यामुळे मी डॉक्टरकडे गेलो. सहा टाके पडले. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी शूट थांबवलं. एका महिन्यात जखम बरी झाली. पुढे पुन्हा शूट सुरु केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

Back to top button