पुण्यात दुधाचा टँकर पलटी; हजारो लिटर दूध वाया

पुण्यात दुधाचा टँकर पलटी; हजारो लिटर दूध वाया

Published on

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुधाचा टँकर पलटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुध आणि ऑईल सांडले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिवाजीनगर येथील राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाचा टँकर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर दूध आणि ऑईल मोठ्या प्रमाणावर सांडले आहे. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर ऑइल पसरल्यामुळे नागरिकांना सद्यस्थितीत वाहने चालविताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडून टँकर बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सध्या सुरु आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news