न्यू यॉर्क : मायक्रोसॉफ्टची व्हिडिओ कॉलिंग सेवा असलेले टीम्स हे अॅप्लिकेशन (Microsoft Teams Down) आज सकाळपासून डाऊन आहे. कार्यालयीन कामासाठी टीम्स या अॅप्लिकेशनचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. ऑनलाईन मीटिंग घेण्यासाठी तसेच इतर प्रकारच्या कम्युनिकेशनसाठी टीम्स अत्ंयंत सोईस्कर असे अॅप्लिकेशन मानले जाते. मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस ३६०सोबत टीम्स हे अॅप्लिकेशन उपलब्ध असते, त्यामुळे टीम्स वापरणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
पण आज सकाळपासून टीम्स तसेच टीम्समधील फिचर्स वापरता येत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनीनी केली आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट नेमकी समस्या शोधण्यात व्यस्त आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे, "'टीम्सचा समावेश असलेल्या मायक्रोसॉफ्ट ३६५ सर्व्हिसेसमध्ये ही समस्या दिसून आली आहे. ऑफिस ऑनलाईन, शेअर पॉईंट ऑनलाईन आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये याचा प्रभाव दिसून आला आहे. यासाठीची अपडेट आम्ही देत आहोत. वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट टीम्स किंवा त्याचे फिचर्स वापरण्यात अडचणी येत आहेत. ही नेमकी काय समस्या आहे, ते आम्ही शोधत शोधत आहोत."
डाऊन डिटेक्टर या साईटवर मायक्रोसॉफ्ट टीम्स भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ७ वाजल्यापासून डाऊन असल्याचे दिसत आहेत.
ही समस्या इंटरनल स्टोअरज सर्व्हिसशी ब्रोकन कनेक्शनमुळे निर्माण झाली, त्यामुळे पूर्ण टीम्स डाऊन झाले. "काही नवीन डिप्लॉयमेंट केल्या होत्या. त्यातील काहींमध्ये ब्रोकन कनेक्शनची समस्या निर्माण झाली. त्यातून टीम्स डाऊन झाले आहे. ही समस्या लवकरच दूर केली जाईल," असे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा?