‘ते’ मृतदेह एलियनचे, त्‍यातील एक कधीकाळी जिवंत होते! : मेक्सिकोच्‍या डॉक्‍टरांचा दावा

‘ते’ मृतदेह एलियनचे, त्‍यातील एक कधीकाळी जिवंत होते! : मेक्सिकोच्‍या डॉक्‍टरांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मेक्‍सिकोच्‍या संसदेमध्‍ये मागील आठवड्यात कथित एलियनच्‍या मृतदेहांचे अवशेष दाखविण्‍यात आले होते. २०१७ मध्ये पेरूमध्ये प्राचीन नाझका लाइन्सजवळ ते सापडले होते. ते सुमारे एक हजार वर्षे जुने आहेत. आता याची तपासणी मेक्सिकाेच्‍या डॉक्टरांच्या पथकाने केली आहे. ( Alien corpses) विशेष म्‍हणजे यातील एक एलियन कधीकाळी जिवंत होते, असा दावा डॉक्‍टरांनी केला आहे. तसेच त्यांच्या 'डीएनए'चा एक तृतीयांश भाग गूढ रहस्याने व्यापलेला आहे, असे वृत्त 'न्‍यू यॉर्क पोस्‍ट'ने दिले आहे.

Alien corpses : एका मृतदेहाच्‍या पाेटात मिळाले अंडे

शास्त्रज्ञांनी सोमवारी (दि.१८) नूर क्लिनिकमध्ये दोन नमुन्यांवर अनेक चाचण्या केल्या. या संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण Jaime Maussan यांच्या YouTube चॅनेलवर करण्‍यात आले हाते. या संशाेधनाबाबत मेक्सिकन नौदलाच्या कार्यालयातील हेल्थ सायन्सेस रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. जोसे झाल्से बेनिटेझ म्‍हणाले की, "२०१७ मध्ये पेरूमध्ये प्राचीन नाझका लाइन्सजवळ सापडलेले एलियन हे एकाच सांगाड्याचे होते. तसेच कवटी हाताळणीचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. दोन लहान शरीरामध्‍ये वाढवलेले डोके आणि प्रत्येक हातावर तीन बोटे आहेत. मृतदेह ७०० ते १,८०० वर्षे जुने आहेत, एक्स-रे मध्ये एका मृतदेहाच्‍या पाेटात रहस्यमय अंडे असल्याचे दिसून आले आहे. त्‍यामुळे त्‍यातील एक कधीकाळी जिवंत असावे, असा निष्‍कर्ष काढला जावू शकताे."

मानवी नसलेल्या" अवशेषांचे "कोणत्याही असेंब्ली किंवा कवटीच्या हाताळणीचा कोणताही पुरावा" आढळला नाही. मी पुष्टी करू शकतो की या मृतदेहांचा मानवाशी कोणताही संबंध नाही, असाही दावा डॉ. बेनिटेझ यांनी केला आहे.

नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोच्या संशोधकांनी केलेल्या कार्बन चाचणीनुसार हे नमुने सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. मेक्सिकन संशोधकांनी दावा केला आहे की, हे पृथ्वीवरील कोणत्याही प्रजातीशी संबंधित नाहीत. यातील एक कधी काळी जिवंत होता, अखंड होता, जैविक होता आणि गर्भावस्थेत होता," असाही  दावा डॉ. बेनिटेझ यांनी केला आहे.

पत्रकार आणि उडत्‍या तबकड्याचे तज्ज्ञ ( युफोलॉजिस्ट) जॅम मौसन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात मेक्सिकन संसदेमध्‍ये ममी केलेले 'एलियन बॉडी'चे सादरीकरण झाले होते. त्‍यांनी यावेळी दावा केला होता की, हे नमुने पृथ्वीवरील उत्क्रांतीचे अवशेष नाहीत. ते शैवाल खाणींमधून शोधले गेले, नंतर जीवाश्म बनले. २०१७ मध्‍ये सापडलले हे मृतदेहाचे अवशेषांचे डोके लांब आहे आणि प्रत्येक हाताला तीन बोटे आहेत. त्‍यामुळे ते मानवासारखे वाटतात, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news